पीओएच कॉलनीत मोटारसायकल पेटविल्या

0

भुसावळ । रेल्वेच्या पीओएच कॉलनीत दोन मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना सोमवार 22 रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. तसेच काही टवाळखोरांनी घराचा दरवाजा देखील पेटवून दिला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रेल्वे कर्मचार्‍यांच्या परिवारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेत गार्ड म्हणून कार्यरत असलेले कमलेश जनार्दन सिंग हे केंद्रीय विद्यालयाजवळील क्वार्टर क्रमांक आरबी-2 मध्ये राहतात़. त्यांचे कुटुंब झोपले असतानाच सोमवार 22 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने बाटलीत पेट्रोल आणून घराच्या जिन्याखाली उभ्या असलेल्या दोन दुचाकींना आग लावली.

रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण
या आगीची भिषणता इतकी होती की, यामुळे क्वॉर्टरमधील विद्युत फिटींगदेखील जळाली आहे. तर या दोन्ही मोटारसायकलची अक्षरश: राख झालेली आहे. या आगीमुळे कमलेश सिंग यांचे सुमारे एक लाखांचे नुकसान झाल़े. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, या भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाकींचे पेट्रोल चोरी होणे तसेच दुचाकी चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आह़े. तसेच अवैध जुगार धंदे देखील सर्रासपणे सुरु असून यांचा परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस प्रशासनातर्फे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.