मुंबई: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांद्रे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालावर १७ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेच्यावतीने काढला जाणारा मोर्चा हा पीकविमा कंपन्यांसाठी इशारा मोर्चा असेल. शिवसेनेचा मोर्चा हा शेतकरी मोर्चा नसून, तो शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.