नंदुरबार। पीक विमा योजनेचा लाभ शेतकर्यांना द्यावा, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बीपीन पाटील यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, सावडीराम करे, रवींद्र वळवी, राजू पाटील, आधार पाटील, ईश्वर माळी यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याने तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात द्यावयाच्या विविध सवलतींमध्ये खरीप 2020-21 चा पिकविमा 6025 शेतकर्यांनी काढलेला आहे. त्यापैकी फक्त 770 शेतकर्यांनाच पिकविमा परतावाचा लाभ मिळालेला आहे. मग इतर शेतकर्याचे काय ? पिक विमा कंपनीकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे शेतकर्यांना देण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्यामुळे पिकविमाधारक शेतकर्यांना पिकविमाचा लाभ त्वरीत मिळावयास हवा होता. परंतू पंचनामे झालेत, मोबाईलद्वारे अनेक तक्रारी पिक विमा कंपनीच्या कार्यालयात शतकरी बांधवांनी करुनही अद्यापपर्यंत पिकविमा भरपाई बहुतेक शेतकर्यांना मिळालेली नाही. तसेच पिककर्ज पुनर्गठनाचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा असून शेतकरी बांधवांना ओला दुष्काळ, पावसाची तुट इत्यादी गोष्टींमुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन निघालेले नाही. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पिककर्ज पुनर्गठनाला त्वरीत चालना मिळावी. व बँकांनी पिककर्ज पुनर्गठनासाठी शेतकर्यांना अडवणुकीचे धोरण अवलबिले असून हा शेतकर्यांवर अन्याय आहे. तरी वरील दोन्ही विषय नंदुरबार तालुक्यात शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून पिकविमा व पिककर्ज पुनर्गठन तत्काळ मिळणे गरजेचे आहे. अशी मागणी
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात