भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल पीटा अॅक्टमधील पसार असलेल्या मीना उर्फ बेबी उर्फ जरीना शे. हमीद शेख (65, दिनदयाल नगर, वैतागवाडी, भुसावळ) यांना गुरूवारी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक अश्विनी जोगी, विकास सातदिवे आदींनी आरोपीस अटक केली.