पीपल्स् बँकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना साहित्यवाटप

0

जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास मंदीरात विद्यार्थ्यांना पीपल्स् बँकेतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बँकेतर्फे ज्येष्ठ संचालक दादा नेवे, शशिकांत विधाते, बँकेचे पी.आर.ओ. गोविंद खांदे यांचेसह लखन धनगर, संतोष ठाकूर, मनोज बारी तसेच मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, वाहन विभाग प्रमुख मिलींद पुराणिक व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. समाजातील अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्टिकोनातून आपण समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून दि जळगाव पीपल्स् बँकेतर्फे दरवर्षी शैक्षणिक साहित्य संच मोफतपणे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. याप्रसंगी आपल्या मनोगतात दादा नेवे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना भरपूर शिका व आपल्या आई-वडिलांचे व गुरुजनांचे नाव लौकीक करा असा मोलाचा संदेश दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका श्रीमती. ज्योती खानोरे यांनी केले.