पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा गुरुवारी मंत्रालयावर मोर्चा

0

पिंपरी-चिंचवड : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. 27) आपल्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार जोगेंद्र कवाडे हे या मोर्चाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
शेतकर्‍यांना पेन्शन योजना सुरू करावी, शहरातील मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणार्‍यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा, अनधिकृत शाळा-महाविद्यालयांवर कारवाई व्हावी, घरकूल तसेच सेक्टर 22 मधील पूनर्वसन प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करून रेडझोनची हद्द कमी करावी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालयाची निर्मिती केली जावी, पूर्णा वाघमारे या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या प्रतिभा महाविद्यालयाच्या उपमुुख्याध्यापकांसह दोन कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या पत्रकावर शहराध्यक्ष रामदास ताटे, उपशहराध्यक्ष अ‍ॅड. दीपक कांबळे, नवनाथ साळवी, पोपट निकाळजे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.