प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन : दोन्ही गटांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
फैजपूर- पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पायी इन्साफ मोर्चा फैजपूर प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात बामणोद ते फैजपूर दरम्यानी पायी मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बामणोद येथे ालेल्या दंगलीप्रकरणी बौद्ध समाजाविरुद्ध दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत, गावात शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी शांतता कमिटीची बैठक घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी दोन्ही गटातील शाळकरी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे नुकसान न होण्यासाठी त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांबाबत विचार न झाल्यास 19 रोजी सुभाष चौकात रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.
यांचा मोर्चात सहभाग
ईन्साफ मोर्चात पीआरपी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख आरीफ, श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष गोपी साळी यांच्यासह महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.