पीपल्स रिपब्लीकन पार्टीतर्फे रावेरात सोमवारी ‘रेल रोको’

0

जगन सोनवणे यांची माहिती ; खान्देशातील केळी आपदग्रस्तांना हवी भरपाई ; वाकडीसह जळगाव घटनेचा निषेध

भुसावळ- वाकडी येथील लहान बालकांची नग्न धिंड, जळगाव येथे आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून आलेला खून तसेच रावेर तालुक्यात चक्रीवादळामुळे केळी उत्पादकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी पीपल्स रिपब्लीकन पार्टीतर्फे सोमवारी रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच मजदूर महासंघाचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परीषदेत दिली.

रावेर रेल्वे स्थानकावर रेल रोको
विहिरीत अंघोळ केल्याने जामनेर तालुक्यातील वाकडी येथे दोन लहान बालकांना नग्न करून त्यांना मारहाण करीत काढण्यात आलेली धिंड तर जळगाव येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना निंदणीय आहे. अशा गुन्हेगारांवर शासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करणे आवश्यक असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा तसेच रावेर व यावल तालुक्यातील केळी बागायतदार शेतकर्‍यांचे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी आदी विविध मागण्यांसाठी सोमवार, 18 जून रोजी रावेर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले जाणार असल्याचे पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला संतोष मेश्राम, हरीष सुरवाडे, आरीफ शेख, राकेश बग्गन, बबलू सिद्दीकी, मौलाना अजीज भाई, राजू डोंगरदिवे, विशाल बाविस्कर, बरकत अली, संगीता ब्राम्हणे, गजानन चर्‍हाटे, दीपक पाटील, सुनील पाटील, सुनील ठाकूर, नगरसेवक मोहसीन खान, फैजपूर, सुधीर जोहरे आदी उपस्थित होते.