पिंपरी – आधुनिक संशोधनाचा व विज्ञानाचा उपयोग सर्व घटकांतील मानवीजीवन अल्प खर्चात समृध्द करण्यासाठी करता आला पाहिजे. पर्यावरणाचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करीत संशोधन विकसित केले पाहिजे. त्या संशोधनाचा उपयोग दीर्घकाळ समाजाला करता आला पाहिजे. यातून वेळ, ऊर्जा व पैशाची बचत होणे देखील महत्वाचे आहे, असे प्रतिपादन भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जि. ए. हिंगे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओई) येथे आयोजित केलेल्या ‘टेक्नोवेट 2018’ या तांत्रिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नर्हे येथील भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरीगचे प्राचार्य डॉ. जी. ए. हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रकल्प समन्वयक प्रा. दीपक बिरादार, प्रा. संतोष रणदिवे आदी उपस्थित होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, उपाध्यक्ष पद्मा भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, एस. डी. मराठे, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. संतोष रणदिवे यांनी मानले. स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सुत्रसंचालन प्रा. दिपक यांनी केले तर आभार प्रा. संतोष रणदिवे यांनी मानले.