नवी दिल्ली-एयरसेल मैक्सिस प्रकरणी माजी अर्थमंत्री कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांना मोठा धक्का बसला आहे. आज याप्रकरणी सुनावणी झाली, यावेळी केंद्र सरकारने पी.चिदंबरम यांच्या विरोधात खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे. पतियाला कोर्टात आज सुनावणी झाली. त्यात पी.चिदंबरम, कार्ती चिदंबरम यांच्यासह इतर काही जणांवर खटला चालविण्यास केंद्राने मजुरी दिली आहे. त्यामुळे पी.चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान चिदंबरम यांना अटक करण्यापासून १८ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.