नवी दिल्ली- एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) ने एयरसेल-मैक्सिस डीलशी संबंध असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी.चिदंरबम यांचा मुलगा कार्ति चिदंबरमच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ईडीने हे चार्जशीट पटियाला हाउस कोर्टात दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये कार्ति चिदंबरम यांच्या विरोधात भ्रष्ट्राचाराचा आरोप करण्यात आला आहे. या चार्जशीटमध्ये पी.चिदंबरम यांच्या नावाचाखील उल्लेख करण्यात आला आहे.
चार्जशीटनुसार या प्रकरणात तब्बल १.१६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. यात २६ लाख रुपये फिक्स डिपोजिट होते. तर कार्ति चिदंबरमच्या एक बँक खाते सील करण्यात आले आहे. त्यात ९० लाख रुपये जमा होते. सोबतच कार्ति चिदंबरम यांचे अनेक बँक खाती ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.