पी-जे मार्गावरील रेल्वे अपघाताचे वृत्त ठरले निराधार

0

मॉक ड्रिलने रेल्वे कर्मचार्‍यांना दिलासा

भुसावळ: पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गावर रेल्वेने ट्रॅक्टर धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याचे वृत्त भुसावळ रेल्वे विभागात कळताच अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची धांदल उडाली तर रेल्वेचे हुटर सातत्याने वाजत असल्याने मोठा अपघात झाल्याचे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताच एकमेकांना नेमके काय घडले याबाबत विचारणादेखील सुरू झाली. रेल्वेच्या अ‍ॅक्सीडेंट रिलीफ वाहनासह अनेक उच्च पदस्थ अधिकारी अपघात स्थळाकडे रवाना झाले. स्थानिक पाचोरा पोलिसांनाही हा संदेश कळताच रुग्णवाहिकेसह फौजफाटा घटनास्थळाकडे निघाला मात्र प्रत्यक्षात खातरजमा केल्यानंतर असा कुठलाही अपघात झाला नसल्याचे कळताच सर्वांना दिलासा मिळाला. दर तीन महिन्यानंतर रेल्वेतर्फे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेची तपासणी करण्यासाठी मॉक ड्रिल घेतले जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.