पुढील वर्षी भारत करणार इंग्लंडचा दौरा

0

मुंबई । इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पुढच्या वर्षी होणार्‍या भारत दौर्‍याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 2018 साली इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारताशी भिडणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऍशेसमध्ये इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.

इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. पाकिस्तानविरुद्धची पहिली कसोटी 24 मे रोजी लॉर्ड्सवर होईल आणि 1 जूनला हेडिंग्लीमध्ये दुसरी कसोटी खेळली जाईल. यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा संघ पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी इंग्लंडला जाईल. 13 जूनला सुरू होणारी एकदिवसीय क्रिकेटची मालिका 24 जूनला संपेल त्यानंतर एकमेव टी-20 सामना 27 जूनला होईल. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानंतर भारत इंग्लंडविरुद्ध तीन टी-20, तिन एकदिवसीय आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलैला तीन टी-20 सामने होतील तर, 12 जुलैपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होईल. 17 जुलैला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होईल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 9 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ही मालिका 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. 2019 साली होणारा आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा इंग्लंडमध्येच होणार आहे. त्यामुळे या विश्‍वचषक स्पर्धेच्या आधी भारताचा इंग्लंडमध्ये चांगला सराव होणार आहे.