पुढील 21 दिवसाच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक सेवा बंद होणार नाहीत- जिल्हाधिकारी

0

जळगाव- जनता कर्फ्यू च्या दरम्यान तसेच कालपासून आपल्या राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरू राहणार आहेत.
कोणीही अजिबात घाबरू नये. पण काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.

सद्यस्थितीत किराणा माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, औषधं, ATM, दवाखाने व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे दुकाने व वितरक यांचेवर बंदी नाही. सर्व बाबी यापुढेही अव्याहतपणे सुरु राहतील. सर्व बाबी केवळ आवश्यकतेनुसारच खरेदी करावे.गरजेपेक्षा जास्त खरेदी करून तुटवडा निर्माण होईल असे करू नये. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच किराणा व इतर बाबींची खरेदी करावी.केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षेसाठीच हे सर्व करीत आहे.तरी कृपया आपण सर्वांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. व या काळात घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.