पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात वर्षा पर्यटणावर बंदी

0

पुणे:– जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयातील धरण परिसरात वर्षा पर्यटनावर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांना जिल्ह्यातील भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला, पानशेत या धरणावर जाता येणार नाही.

जिल्हयातील धरणांमध्ये या अगोदर अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धरण परिसरात जाण्यास बंदी घातली गेली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले. नियमांचे पालन न केल्यास पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात नागरिक वर्षा पर्यटनासाठी येतात. धरण परिसरात होणाऱ्या गर्दीमुळे पाण्यात बुडून मरण पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. ते टाळण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.