पुणे – जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे गाव कारभाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. २५८ ग्रामपंचायतीमधील ४५६ रिक्त पदांसाठी आज मतदान होत आहे. या मतदानादरम्यान काही गैरप्रकार होवू नये म्हणून पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकीचा निकाल २८ मे रोजी लागणार आहे.