कराड । गत राज्य अजिंक्यपद दोन्ही गटांमध्ये वर्चस्व राखणार्या पुणे जिल्ह्यसमोर शुक्रवारपासून सुरू होणार्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आव्हान असणार आहे. दिवंगत पी. डी. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लिबर्टी मजदूर मंडळ, कराड यांच्या विद्यमाने कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत होणार्या या स्पर्धेत पुरुष गटात 25,तर महिला गटात 20 जिल्ह्याच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
मागील वर्षी सांगली येथे झालेल्या 64व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत दोन्ही गटांंधमध्ये पुण्याने बाजी मारली होती, तर मुंबई उपनगर संघाला दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी पुण्याचा पुरुष संघाला मागील यशाची पुनरावृत्ती साधण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. तर त्यांच्या महिलांच्या संघाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा पुरुष व महिला गटाचा प्रातिनिधिक संघ निवडण्यात येणार आहे.
पुरुष गट :
अ गट : पुणे, परभणी, जालना, नांदेड.
ब गट : मुंबई उपनगर, जळगाव, अहमदनगर, सिंधुदुर्ग.
क गट : ठाणे, धुळे, उस्मानाबाद, लातूर.
ड गट : मुंबई शहर, रायगड, सातारा, पालघर.
इ गट : सांगली, नंदुरबार, सोलापूर, नाशिक.
फ गट : रत्नागिरी, कोल्हापूर, हिंगोली,
औरंगाबाद, बीड.
महिला विभाग:
अ गट : पुणे, सातारा, सोलापूर.
ब गट : मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रायगड.
क गट : मुंबई शहर, नाशिक, औरंगाबाद.
ड गट : ठाणे, अहमदनगर, जालना.
इ गट : कोल्हापूर, पालघर, बीड, लातूर.
फ गट: सांगली, रत्नागिरी, परभणी, उस्मानाबाद.