धुळे- पुणे ते धुळे प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बॅगेतून सुमारे 50 हजारांची रोकड लांबवली. त्यानंतर देवपुरात सकाळी ही लक्झरी आल्यावर हा प्रकार समोर आला. घटनेबद्दल पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिता अरुण ठाकूर (43, तुषार पॅलेस ड्रीम बंगलो, प्लॉट न 5/6, गोंदूर रोड, कीर्ती अपार्टमेंटच्या मागे, धुळे. ह. मु. चिखली, देेहूरोड, रस्टीक पॅराडाइज, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीनुसार ओम बजरंग ट्रॅव्हल्समधून त्यांनी पुणे निगडी ते धुळे शहर असा प्रवास केला. या वेळी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत सुमारे 50 हजारांची रोकड होती. अज्ञात चोरट्याने बॅगेला तीक्ष्ण हत्याराने मारुन रोकड लांबवली. रविवार, 1 रोजी सकाळी साडेसहा वाजता श्रीमती ठाकूर या देवपुरातील दत्तमंदिर चौकात उतरल्या. त्या वेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनेनंतर त्यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.