पुणे : सकाळी पहाटेच्या सुमारास सणसवाडीमध्ये झायलो कारचा अपघात झाला आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यु झाला असून २ जण जखमी झाले आहेत.
विजय सुभाष शिवले, किशोर बाळासाहेब गोडसे अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पुण्याच्या दिशेने सकाळी कार जात होती. अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दोनदा पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.