पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचा उद्या शुभारंभ

0

मुख्यमंत्री दाखवणार हिरवी झेंडी ; विभागातील प्रवाशांना दिलासा

भुसावळ- मध्य रेल्वेतर्फे 11417 व 11418 पुणे-नागपूर-पुणे दरम्यान धावणार्‍या हमसफर एक्सप्रेसचा रविवार, 3 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबईत व्हिडिओ लिंकद्वारे शुभारंभ होत आहे. उद्घाटनाच्या स्पेशल ट्रेन 01417 पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस दुपारी 4.40 वाजता पुण्याहून नागपूरसाठी सुटणार असून दुसर्‍या दिवशी ही गाडी 6.55 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

‘नियमित हमसफर’ 7 पासून धावणार
नियमित 11417 पुणे-नागपूर हमसफर गुरुवार, 7 रोजी रात्री 10 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी दिड वाजता नागपूरला पोहोचेल तर 11418 नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेस 8 मार्च रोजी दुपारी तीन वाजता नागपूरहुन सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजून पाच मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी साप्ताहिक असून पुण्याहून नागपूरसाठी गुरुवारी तर नागपूरहून पुण्यासाठी दर शुक्रवारी सुटणार आहे. या गाडीला दौंड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने भुसावळ विभागातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.