पुणे- विकासाच्या अजेंड्यावर सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर सुरू आहे. अशा प्रकारचे काम सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे. पुण्याचे नाव बदलून इतिहास पुसण्याचे काम कोणीही करू नये. या सरकारला इतिहासाची लाज वाटते का?, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
काहीही झाले तरी मनसेला सोबत घेणार नाही
सध्या लोकसभेची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार आहे. यासाठी दोन ते तीनवेळा बैठक झाली आहे. काही जागांची निश्चिती काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. पुण्यातील जागा कोण लढवणार याची चर्चा अजून व्हायची आहे. मी कऱ्हाडचा आहे पुण्यात निवडणूक लढवणार नाही. आम्ही आघाडीत लढवणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काही नेते चर्चा करत आहात. त्यांच्यासाठी जागा सोडण्यास तयार आहोत. मात्र त्यांच्यासोबत आम्ही एमआयएमसोबत जाणार नाही. मनसेबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. काहीही झाले तरी मनसेला सोबत घेणार नाही. आमच्या मित्र पक्षाने घेतले तर आमची हरकत नाही.