पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मिळाली गती

0

खासदार आढळराव यांची माहिती

फेब्रुवारीमध्ये निविदा प्रक्रिया, भूसंपादनकामास प्रारंभ

पुणे : गेल्या दोन दशकांपासून केवळ कागदावर असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला अता गती मिळून आहे. नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये या मार्गासाठी प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया आणि भूसंपादनाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

केवळ दोन तासांचा प्रवास

केंद्र सरकारच्या 2016 वर्षाच्या रेल्वे बजेटमध्ये पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भारतीय रेल्वेने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे काम केले. मात्र, अभियांत्रिकी सर्वेक्षण सुरू असतानाच हा प्रकल्प नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल) हस्तांतरीत केला. ’महारेल’ने पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची नव्याने आखणी सुरू केली आहे. त्यानुसार आधीच्या मार्गात बदल करून नवीन मार्गाचे सर्वेक्षण देखील सुरू केले. ’या प्रकल्पाच्या दुहेरी ट्रॅकसाठी सुमारे 7500 कोटी रुपये खच आहे. पुणे-नाशिक ही प्रस्तावित रेल्वे भारतातील पहिलीच हायस्पीड रेल्वे असणार असून, ती 220 किमी प्रतितास वेगाने धावू शकणार आहे. त्यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास केवळ दोन तासात पार करता येईल, असा दावाही आढळराव यांनी केला.

हायस्पीड रेल्वे मार्ग दृष्टिक्षेप

एकूण मार्ग 231.761 किमी लांबीचा असणार
180 किमी मार्गाचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण
पुणे-नाशिक या हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून 1300 हेक्टर जमिनीचे संपादन
20.62 किमी लांबीचे एकूण 12 बोगदे बांधणार
नद्यांवर 15 पुलांचे बांधकाम
सात रेल्वे उड्डाणपूल, जवळपास 150 छोटे पूल, 31 दरीपूल, 170 ठिकणी मोरी (कल्व्हर्ट), 18 ठिकाणी मोठे भुयारी मार्ग, 99 छोटे भुयारी मार्ग
21 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग होणार, 11 जागी कॅनॉल क्रॉसिंग

असा आहे मार्ग

पुणे – हडपसर – वाघोली – कोलवडी – आळंदी – चाकण – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – आळेफाटा – बोटा – जबुत – साकूर – अंबोरे – संगमनेर – देवठाण – दोडी – सिन्नर – मुढारी – शिंदे आणि नाशिक रोड असा नवीन रेल्वेमार्ग निश्‍चित करण्यात आला