पुणे परिसरात अवकाळीची शक्यता

0

पुणे : पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरासह दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात पुढील आठवड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, शहर परिसरात शनिवारी दुसर्‍या दिवशीही ढगाळ हवामान होते.

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी येतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील किमान तीन दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. मात्र, मुंबई, कोकणसह उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, असा अंदाजही वेधशाळेने वर्तवला आहे.

शहर आणि परिसरात हवेचे दाब निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्या भागात ढग येत आहेत. 2 ते 6 मे या काळात शहर आणि परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जनशक्तिशी बोलताना व्यक्त केला. चांगल्या मॉन्सूनसाठ सध्याचे हावमान पोषक असून, यंदा पावसाला लवकर प्रारंभ होऊ शकेल, असे मतही डॉ. साबळे यांनी व्यक्त केले.