गुन्हे शाखेची काही पथकेदेखील बंद
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. तर शाखेची काही पथकेदेखील बंद करण्यात आली आहेत. तेथील अधिकारी कर्मचार्यांची इतरत्र बदली झालीआहे. गुन्हे शाखेमध्ये युनिट 1 ते 5 तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वाड), वाहन चोरी विरोधी पथक अशी तेरा पथके होती. गुन्ह्यांची उकल लवकर व्हावी यासाठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्त्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरू केल्या होत्या. आठवड्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात अधिकार्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार हा फेरबदल करण्यात आला आहे. बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील पोलिसांना सध्या अस्तिवात असलेल्या युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5, खंडणी विरोधी पथक, भरोसा सेल यामध्ये सामावून घेतले आहे.
कार्यक्षेत्रातच युनिटची कार्यालये
युनिट 1चे कार्यालय पोलीस आयुक्तालयाच्या आवारात असून युनिट 2चे कार्यालय सोमवार पेठ पोलीस वसाहत, युनिट 3चे कार्यालय पौड रोडवरील अंटी गुंडा स्कॉडच्या कार्यालयात, युनिट 4चे कार्यालय खडकीतील रेंजहिल येथे, युनिट 5चे कार्यालया मेगा सेंटरशेजारी असणार आहे. अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक पोलीस आयुक्त कार्यालयातच राहणार आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे (जुने ठिकाण) : राजेंद्र कदम (दरोडा विरोधी पथक) युनिट 1, गजानन पवार (युनिट2) युनिट 2, दीपक निकम (प्रॉपर्टी सेल) युनिट 3, अंजुम बागवान (एओसीसी उत्तर) युनिट 4, दत्तात्रय चव्हाण (युनिट5) युनिट 5, रघुनाथ जाधव (खंडणी विरोधी पथक) खंडणी विरोधी पथक, विजया कारंडे (महिला सहाय्य कक्ष) भरोसा सेल, स्वाती सुधीर थोरात (अमली पदार्थ विरोधी पथक) ज्येष्ठ नागरिक कक्ष, दीपक लगड (वाहनविरोधी पथक) प्रिव्हेन्टिव्ह बँच, गिता दोरगे (एमओबी) एम ओ बी, क्रांती पवार (प्रशासन, गुन्हे शाखा) प्रशासन, गुन्हे शाखा), वियज टिकोळे (युनिट2) तांत्रिक विश्लेषण, सुनिल दोरगे (अमली पदार्थ विरोधी पथक) अमली पदार्थ विरोधी पथक), मनिषा झेंडे
(सामाजिक सुरक्षा) सामाजिक सुरक्षा.