पुणे । 29 व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना सकाळी 10.30 वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथेे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, आयली घिया, अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. सतीश देसाई, काका धर्मांवत, बाळासाहेब आमराळे, भगवान कडू, अशोक मेमजादे, रविंद्र दुर्वे, प्रसन्न गोखले, श्रीकांत कांबळे, अनुराधा भारती, तेजश्री अडिगे, सुप्रिया ताम्हाणे, दत्तात्रय पोळेकर, सुहास रानवडे, विनेश परदेशी, तानाजी चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते. वेदमूर्ती धनंजय घाटे गुरुजी यांनी पौराहित्य केले. विभागीय आयुक्त दळवी, अभिनेत्री तेजस्विनी, आयली घिया यांचा सत्कार कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली आहे.