पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे धोक्यात

0

पुणे: पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे धोक्यात असून जात प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या नगरसेवकांचा निर्णय राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतला जाण्याची शक्यता आहे. सात पैकी पाच नगरसेवकांनी आपले जात प्रमाणपत्र मुदतीनंतर सादर केली असून, उर्वरित दोघांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत.

जात प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या मुदतीतच सादर करणे बंधनकारक असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे निकालाची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने करणार की भविष्यात तो बंधनकारक राहणार हे अद्याप स्पष्ट नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.