पुणे: जंगली महाराज रस्ता हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याचे रस्ते, पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पदपथ मोठमोठाले करून रस्ता अतिशय अरुंद करण्यात आला आहे. परंतु ह्या पदपथाचा व पार्किंग खरच सामान्य नागरिकांना उपयोग होत असेल का ?? तर नाही. काही मोबाईल कंपन्या ह्या आपल्या मोबाईल व कंपनीची मोफत जाहिरात करण्या करिता दर शनिवार, रविवारी या पदपथावर दिवसभर अनधिकृत स्टेज/ मांडव उभारून स्टेज शो, पथनाट्य, गेम शो घेतात व मुलीही नाचवल्या जातात.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठमोठ्या स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभ्या करून मोठ्या आवाजात लावल्या जातात. ऐन सणासुदीच्या काळात तर काय बोलायलाच नको या ठिकाणी मोठमोठ्या प्रखर प्रकाशाच्या लाइटिंग करून मंडप पूर्ण रस्त्यावरच लावले जातात. व दिवसभर गाणी सुरु असतात. गणपती, नवरात्र, दहीहंडी, माणसाच्या आयुष्यात एकदाच येणारा लग्न सोहळ्यात व इतर उत्सवाच्या वेळेस साउंडवर, स्टेज, मंडपावर, शासन व पोलीस लगेच कारवाई करतात मग हे राजरोस पणे चाललंय यावर का कारवाई होत नाही?
या सर्व बाबतीत मनपाच्या संबंधित अतिक्रमण अधिकाऱ्यांना व पोलीस स्टेशनला कळवून सुद्धा या प्रकरणात सुधारणा होत नसल्याने अखेर मनसेने आपल्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करून या मोबाईल कंपन्यांना आज धडा शिकवला.
यावेळी मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष सुहास निम्हण, विनायक कोतकर, उदय गडकरी, गोकुळ अडागळे, मुकेश खांडरे, योगेश शिंदे, नचिकेत टिकम, निखिल बाराते, प्रशांत नलावडे, दिनेश आमले, यश पढेर शंकर पवार, सतीश पाटोळे तसेच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.