पुणे, सांगली, कोल्हापूरमध्ये भिडेंचा ‘सन्मान’!

1

प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी

मुंबई/पुणे/सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनासाठी पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत भिडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते.

मृत राहुल फंटागळेच्या आईचा सहभाग
सन्मान मोर्चांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाजी भिडेंवर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशा घोषणा देत धारकरी रस्त्यावर उतरले होते. सांगलीत कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघाला तर पुण्यातील मोर्चामध्ये भीमा कोरेगाव हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फंटागळेची आईदेखील सहभागी झाली होती. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांना अटक करावी. तसेच त्यांची बे्रन मॅपिंग चाचणी करण्यात यावी, अशी मागणीही पुण्यातील सन्मान मोर्चात करण्यात आली. पुणे येथील सन्मान मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकर्‍यांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले.