मुंबई । विफा आयोजित महिला विफा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ऑल पुणे मॅच असा असणार अहे. या निर्णायक लढतीत एफ सी पुणे सिटीसमोर युनायटेड पुणा स्पोर्ट्स असोसिएशनचे आव्हान असणार आहे. सामन्याच्या निर्धारीत वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शुटआऊट पर्यंत रंगलेल्या सामन्यात बलाढ्य मुंबईच्या बॉडीलाईन फुटबॉल क्लबवर 7-8 असा निसटता विजय मिळवत एफ सी पुणे संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत युनायटेड पुणा संघाने आधार प्रतिष्ठानचा 1-0 असा पराभव केला. संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ करणार्या बॉडीलाईनच्या खेळाडूंना पेनल्टी शूटआऊटमध्ये आपला दम दाखवता आला नाही.
सुरुवातीच्या खेळात उभय संघ 1-1 असे बरोबरीत होते. बरोबरीची ही कोंडी त्यानंतर जादा मिनिटांच्या खेळात 3-3 अशी कायम राहिली. शूट आऊटमध्ये जिआ सुंदरम, पुजा मोरे, मुरीएल अॅडम, एैश्वर्या गाडेकर, सेनोरिटा नाँगपुल्ह, निकीता जाधव, मर्लिन अॅडमने गोल करत संघाला विजयी केले. बॉडीलाईनच्या अदिती शेट्टी, जुही शाह, रितीका सहानी, आर्क डिसील्वा, रेहा रॉड्रिग्ज आणि वॅलेंसीआ डिमेलोने गोल केले. दुसर्या लढतीत एैश्वर्याने सामन्यातील 3 र्या मिनीटाला गोल केला.