पुणे सुपरक्रॉसः स्टॅलियन रायडर्स विजयी

0

पुणे । आपल्या रायडर्सच्या उत्तम कामगिरीमुळे प्रथमच लीगमध्ये सहभागी झालेल्या स्टॅलियन रायडर्स या संघाने पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग च्या चौथ्या सत्रात विजेतेपद पटकावले आहे. पुण्यातील रॉयल पाम्स, मुंढवा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्टॅलियन रायडर्सने एसएक्स 2 कॅटेगरीतून जास्त गुण मिळविले. या विभागात त्यांना 178 गुण मिळाले. पृथ्वी सिंग हा या टीमसाठी खास ठरला असून त्याने 91 गुण मिळवले. चंदिगडस्थित या रायडरने सहा मोटोंपैकी दोन मोटोंमध्ये दुसर्‍या क्रमांकावर स्थान पटकावून एका मोटोमध्ये प्रथम स्थान पटकावले. गोव्याच्या जावेद शेख याने एसएक्स 2 कॅटेगरीत पृथ्वीला जोरदार स्पर्धा दिली. जावेदने टीम ग्रीशमचे प्रतिनिधित्व केले. 424 गुण मिळवून ही टीम दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाली. या गोवास्थित स्पर्धकाने 117 गुण मिळवून आपल्या टीमला मोठे योगदान दिले.

सहापैकी पाच मोटोंमध्ये तो विजेता ठरला असून एका मोटोमध्ये दुसरे स्थान मिळवले. या कॅटेगरीत जावेद याला सर्वोत्कृष्ट रायडर म्हणून किताब मिळाला. एसएक्स 1 कॅटेगरीमध्ये इंक रेसिंगच्या हरीथ नोआ याने प्रथम क्रमांक पटकावला असून सहापैकी 5 मोटोंमध्ये त्याने प्रथम व एकात द्वितीय स्थान मिळवले. हरीथला या कॅटेगरीतील सर्वोत्कृष्ट रायडर म्हणून गौरवण्यात आले. हरीथ हा सध्याचा राष्ट्रीय चॅम्पियन असून त्याने आपली दमदार प्रदर्शनाने प्रेक्षकांची माने जिंकली. या लीगमध्ये सलग दुसर्‍यांदा त्याला सर्वोत्कृष्ट रायडरचा मान मिळाला. सातार्‍याची तनिका शानबाग ही महिला रायडर सहा मोटोंमध्ये 114 गुण मिळवणारी एसएक्स ज्युनिअर कॅटेगरीतील एकमेव रायडर ठरली आहे.