पुणे : पुणे रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. हा डबा दुरंतो एक्स्प्रेसचा होता. दुपारच्यावेळी लागलेल्या या आगीचे कारण कळू शकले नाही. हा डबा एसी कोच होता. अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने ही आग विझविली. जळालेला डबा तातडीने दूर करण्यात आल्याने अनर्थ टळला होता. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. या आगीने काहीही जीवितहानी झाली नसली तरी डबा पूर्णपणे जळाला होता. रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.