पुणे स्मार्ट सिटीचा विद्यापीठाशी करार

0
पुणे : शहरात नवकल्पनांची संस्कृती रुजवण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेंटर ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेज च्या सहयोगाने काम करण्याचा निर्णय घेतला असून तसा नुकताच करारही करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. याप्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजीत बोस आणि विद्यापीठाचे रजिस्टार डॉ.प्रफुल्ल पवार उपस्थित होते.
शहरात डेटा प्रणीत नवे उपक्रम राबविण्यासाठी सहयोगी संस्थांची इको सिस्टीम निर्माण करण्याचा स्मार्ट सिटी आणि पुणे आयडिया फॅक्टरी फाउंडेशन (पीफ) चा प्रयत्न आहे. विद्यापीठाबरोबरची भागीदारी त्याचाच एक भाग आहे.
स्टार्टअप च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रकल्प आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ.जगताप यांनी सांगितले. उदयोन्मुख व्यावसायिकांना व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठबळ याद्वारे मिळेल असे बोस यांनी सांगितले.