पुणे स्मार्ट सिटीचे मॉडेल मध्यप्रदेशात राबविणार

0
पुणे : मध्यप्रदेशातील चार स्मार्ट सिटींच्या अधिकाऱ्यांनी पुण्याचा विशेष दौरा करून पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचा अभ्यास केला आणि विविध प्रकल्पांचे मॉडेल आपापल्या शहरात राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
मध्यप्रदेशातील उज्जैन, जबलपूर, सतना आणि सागर या शहरांतील १० अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाची माहिती घेतली. स्मार्ट स्ट्रीट, स्मार्ट प्लेस मेकींग, स्मार्ट एलिमेंट्स, पुणे वायफाय आदी प्रकल्पांचे त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. या अधिकाऱ्यांच्या पथकाने बाणेरमधील रिन्यू आणि एनर्जाइज या साईट्सना भेट दिली. औंधमधील स्मार्ट स्ट्रीट ची वैशिष्ट्ये जाणून घेतली. स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, औंधमधील लाईटहाऊस प्रकल्प याला भेटी दिल्या. लाईटहाऊस प्रकल्पातील रोजगार मिळविलेल्या युवतींशी संवाद साधला.
पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अभ्यासासाठी परराज्यातून आधिकारी येत आहेत ही आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.