पनवेल । भारतीय जनता पार्टी पनवेल, रायगड व संजय भोपी सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यअजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याचा योगेश जाधव महाराष्ट्र श्री किताबाचा मानकरी ठरला.स्पर्धेत राज्यातील 24 जिल्ह्यांमधून 250 शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. रायगड बॉडी बिल्डर फिटनेस असोसिएशन आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनने या स्पर्धेला मान्यता दिली. किताब विजेता योगेश जाधव भोसरीतील अल्टेम जिम फिटनेस क्लबमध्ये सराव करतो.
पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब, इंडियन बॉडी बिल्डर फिटनेस फेडरेशन सरचिटणीसा डॉ. संजय मोरे, पनवेल महापालिका नगरसेवक भाई नितीन पाटील, मनोहरशेठ म्हात्रे, स्थायी समिती सदस्य, रायगड बॉडी बिल्डर फिटनेस असोसिएशन अध्यक्ष, नगरसेवक संजय भोपी, कार्याध्यक्ष, छत्रपती पदक विजेता मारुती आडकर सचिन दिनेश शेळके यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले.या स्पर्धेच्या जोडीने 40 वर्षा वरील मास्टर्स महाराष्ट्र श्री तसेच दिव्यांग महाराष्ट श्री आणि महिला गटाच्या स्पर्धा झाल्या.