पुण्यातील इसमाने पत्नीची हत्या करून स्वत:केली आत्महत्या !

0

महाबळेश्वर- पुण्यातील विश्रांतवाडी येथील दाम्पत्याची महाबळेश्वर येथे फिरायला गेले असतांना भांडण झाल्याने संतापलेल्या पतीने मुलासामोरच पत्नीची हत्या करून स्वत:देखील आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीनेही आत्महत्या केली असून ही सर्व घटना त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखतच घडली आहे. त्यानेच या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली आणि हा प्रकार उघड झाला.

अनिल शिंदे पत्नी सीमा आणि मुलगा आदित्य याच्यासह महाबळेश्वरमध्ये फिरायला गेले होते. काल ते महाबळेश्वरमधील एका हॉटेलमध्ये उतरले. रात्री अनिल आणि सीमा यांच्यात वाद झाला. या भांडणामुळे संतापलेल्या अनिलने सीमा यांच्यावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. यानंतर अनिलनेही आत्महत्या केली. हॉटेलच्या खोलीतच हा सर्व प्रकार घडला. त्याच खोलीत त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा आदित्यही होता. या भयावह घटनेने घाबरलेल्या आदित्यने नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला होता, याचा पोलीस तपास करत आहेत.