पुण्यातील एअर फोर्स शाळेच्या मैदानात आढळला हँड ग्रेनेड !

0

पुणे : लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात आज मंगळवारी १४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हँड ग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा ग्रेनेड डिस्पोज केला आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मुले खेळत होती. त्यांना एक संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यांनी ती उचलून शाळेच्या शिक्षकांना दिली. त्यांना ती संशयास्पद वाटल्याने त्यांनी विमानतळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला याची माहिती दिली. हे पथक तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा ती वस्तू म्हणजे जिवंत हँड ग्रेनेड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन हा हँड ग्रेनेड डिस्पोज केला असे सांगितले.