पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची मुंबईत घोषणा
हे देखील वाचा
मुंबईः पुणे येथील दांडेकर पूलाजवळील कालवा फुटून आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे भागातील नागरिकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे या पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ३ कोटी रूपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी दिली. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले कि, या भागात आलेल्या पुरामुळे ९८ घरे उध्वस्त झाली आहेत. तर ४०० ते ५०० घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांचे पंचनांमे करण्याचे काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक महिन्याचे धान्य देखील नुकसानग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.