पुणे:- केंद्र सरकारने 8 जून पासून देशातील धार्मिक स्थळ सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता राज्य सरकारने धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्या मुळे पुणे शहरातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर 30 जून पर्यंत बंद राहणार आहे.
संकष्टी चतुर्थी 8 जून रोजी असल्याने गणेश मंदिर खुली होणार असा भाविकांचा समज झाला आहे. पण मंदिर बंदच राहणार असल्याने भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन मंदिर ट्रस्टने केले आहे.
राज्यसरकारच्या पुढील आदेशानंतर जुलै महिन्यात मंदिर सुरू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. भाविकांनी मंदिरात येण्याऐवजी संकेतस्थळावरून किंवा सोशल मीडिया साईट वरून दर्शन घ्यावे असे आवाहन ट्रस्टने केले आहे.