पुण्यातील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक

0

पुणे : पुण्यातील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय. संजय सिंह आणि पांडूरंग वनारे अशी त्यांची नावे असून दोघेही रेल्वेच्या अभियंता विभागाशी संबंधित आहेत. पुण्याच्या शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती.

मनुष्यवधाचा गुन्हा

याप्रकरणी होर्डिंग काढण्याचं काम करणारे ठेकेदार, त्यांचे कामगार तसेच रेल्वेच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दुर्घटनेला प्रामुख्यानं रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं होतं.