पुण्यात आंतरराष्ट्रीय परिषद

0

पुणे । एमआयटी, पुणे आणि एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ (एमआयटी डब्यूपीयू) यांच्यातर्फे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या सहकार्याने 10 ते 11 फेब्रुवारी 2018 रोजी हॉटेल प्रेसिडेंट, पुणे येथे माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा उदय या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

डॉ. परळीकर यांच्या हस्ते उद्घाटन
10 फेब्रुवारी रोजी हॉटेल प्रेसिडेन्ट येथे सकाळी 10 वाजता डिआरडीओच्या आर अ‍ॅण्ड डीईचे संचालक डॉ. व्ही. व्ही. परळीकर हे या परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड आणि परदेशातील शास्त्रज्ञ व संशोधक हे या परिषदेत सहभागी होणार आहेत. बीज भाषण, सादरीकरण आणि माहिती, संपर्क व तंत्रज्ञान यावरील सर्वंकष चर्चा, याचा या परिषदेत समावेश आहे.

मानवजातीला अनुभवसंपन्न बनविणे
माहिती व संपर्क तंत्रज्ञान यांना दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येत चालले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून ज्ञानाधारित वातावरण निर्माण करणे, त्या योगे मानवजातीला अनुभवसंपन्न बनविणे आणि त्याद्वारे जीवनाची गुणवत्ता उंचावणे हे सर्व आयसीटीमुळे घडू शकते. माहिती व संपर्क तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून सतत घडत असलेला सृजनशील विकास, याविषयी अगदी अखेरच्या क्षणापर्यंतचा विकास यावर सर्वसमावेशक चर्चा घडवून आणणे हा या परिषदेमागचा प्रमुख हेतू आहे. आयसीटी, रोबोटिक्स, वेबसिक्यूरिटी, कॉग्निटिव्ह कोलॅबोरेशन आणि डेटा मायनिंग या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना या परिषदेबद्दल अधिक उत्सूकता वाटेल.