पुण्यात छगन भुजबळ समर्थकांची बैठक

0

पुणे । अन्याय पे चर्चा एक दिवस भुजबळांसाठी पुणे शहर जिल्ह्यातून छगन भुजबळ समर्थकांची बैठक जंगली महाराज रोडवरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे अपर पडली. भुजबळांच्या समर्थनार्थ आपण सर्वानी येत्या मार्च महिन्यात अधिवेषण काळात मुंबईमध्ये विधानभवनावर काढण्यात येणार्‍या मोर्चामध्ये मोठया संख्येने सहभागी होणार असून. त्यासाठी पुणे शहर जिल्ह्यात वेगवेळ्या ठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत असे कृष्णकांत कुदळे यांनी सांगितले.

या बैठकीस भुजबळ समर्थक कृष्णकांत कुदळे, डॉ. कैलास कमोद, , प्रितेश गवळी, शिवराम जांभुळकर, वसंत लोंढे, युवराज भुजबळ, गौतम बेगाळे, ऍड. के. टी. आरु, मंजिरी धाडगे, गिरीजा कुदळे, वसंत कुदळे, दीपक जगताप, आबा भोंगळे, अविनाश चौरे ,अनिल लडकत, मधुकर राऊत, सुनीता भगत , सपना माळी, आनंदा कुदळे, प्रकाश लोंढे, वसंतकुमार भाटिया, तुकाराम गायकवाड , ज्ञानदेव बनकर, कैलास काठे, प्रशांत एकतपुरे आदी मान्यवर उपस्थित होते .

सरकार सुडबुध्दीने वागत आहे
यावेळी डॉ. कैलास कमोद म्हणाले, गेली 23 महिने छगन भुजबळ यांना चौकशीच्या नावाखाली डांबून ठेवले आहे. त्यांच्यावर आरोप बिनबुडाचे आरोप असून सध्याचे सरकार सूडबुद्धीने भुजबळ साहेबांशी वागत आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांची मोठी ताकद आहे. विशेषतः त्याच्यामागे जनाधार आहे. राज्यातील दलित, ओ. बी. सी. , भटक्या विमुक्त जाती जमाती व मुस्लिम बांधव त्यांना मानतो. त्यांनी मंडल आयोगाची त्यांनी अंलबजावणी झाल्यामुळे आय. आय. टी. व आय. टी. एम. या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे . त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे .