पुणे | येथील सुखसागरनगर परिसरात असलेल्या सर्वरोग निवारक गजानन क्लिनिक या रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली. शुक्रवारीारपणाला कंटाळून या डॉक्टरने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून, कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये याबाबत अकस्मात मयत दाखल करण्यात आले असून, तपासाअंती महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे.
डॉ. इंदू शाम डोंगरे (रा. साईनगर, सुखसागरनगर, कोंढवा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. काल रात्री या महिला डॉक्टरने गजानन क्लिनिकच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. मयत डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन क्लिनिक हे रुग्णालय आहे. मागील काही दिवसांपासून इंदू यांच्यावर मानसोपचार तज्ञाकडे उपचार सुरु होते, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. मात्र त्यांना कोणता मानसिक आजार होता हे समजू शकलेले नाही.
डॉ इंदू यांनी या उपचारांना कंटाळूनच गजानन क्लिनिकच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. त्यांनी उडी मारल्यानंतर झालेल्या आवाजाने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सायंकाळची वेळ असल्याने रुग्णालयात आणि रुग्णालयाच्या दारातच असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होती. यावेळी डॉ शाम डोंगरे यांनी लागलीच डॉ इंदू यांच्यावर प्रथमोपचार करून, उपचारार्थ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारार्थ दुसऱ्या रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला.
डॉ इंदू यांनी आत्महत्या का केली याबाबत अधिकृत खुलासा झालेला नसून, कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे. तपासाअंती त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येणार आहे. मात्र आताच्या धावपळीच्या आयुष्यात रुग्णांना बरे करणाऱ्या डॉक्टरांवर जर शुक्रवारीारपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ येत असेल, तर रुग्णनिर्मिती करणाऱ्या औषधांनी आता डॉक्टरांना देखील ग्रासले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.