पुणे । पुण्यात पुणे रायझिंग आणि मुंबई इंडियन्समध्ये गुरुवारी झालेल्या आयपीएल 20 ट्वेंटी सामन्याच्या आधी शानदार उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात खास आकर्षण ठरले ते मराठमोळे सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी मराठी संस्कृतीला दर्शविणार्या काही गीतांचे प्रस्तुतीकरण उपस्थितांना थिरकायला भाग पाडत होते.