पुणे-मान्सून केरळमध्ये दाखल होऊन चार दिवस उलटले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात काहीसा बदल झाला आहे. दरम्यान कालपासून पुण्यात हवामानात बदल जाणवत होता. आज अखेर पुण्यात पाण्याचे आगमन झाले आहे. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते त्यामुळे पाऊस येणार असा अंदाज वर्तविले जात होते. अखेर पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या दमदार हजेरीने नागरिक सुखावले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला धडकतो. मात्र, यंदा दोन ते तीन दिवस आधीच २८ मेला केरळात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.