पुणे- पुण्यातील धनकवडी येथील शाहू बँकेजवळच्या भररस्त्यात 12 जिवंत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहकारनगर पोलीस याचा तपास करत आहेत. धनकवडी येथील शाहू बँकेच्या चौकातील रस्त्यावर 12 जिवंत काडतुसे पडल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ती काडतुसे हस्तगत केली असून भर रस्त्यात सापडलेली ही काडतूसे कोणाची आहेत याचा तपास सुरू आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशनमधील किंवा इतर पोलिसांजवळील जिवंत काडतुसे त्यांच्या नकळत रस्त्यावर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 9 एम एम ची ही काडतुसे आहेत. कोणत्या पोलिसाकडून ही काडतुसे पडली आहेत का याचा तपास करण्यात येत असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.