पुणे : सासूच्या छळास कंटाळून एका पोलीसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. या घडनेमुळे हडपसर परिसरात खळबळ उडाली आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात तपास पथकातील पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांची पत्नी जान्हवी कांबळे हिने सासूच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. जान्हवीने तिचा दोन वर्षाचा मुलगा शिवांशची आधी हत्या केली. त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. हा संपूर्ण प्रकार पहाटे उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी जान्हवीने सुसाईड नोट लिहली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.