पुण्यात यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन

0

पुणे । पुण्यामध्ये रविवारी 28 जानेवारी रोजी यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय साधणारे विविध उपक्रम यावर चर्चा, परिसंवाद अनुभवकथन असे याचे स्वरुप आहे. कैलास मानसरोवर यात्रा, नर्मदा परिक्रमा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, दत्त परिक्रमा, पंच कैलास, पंच बदरी, पंच केदार, स्वर्गारोहीणी यात्रा, गिरनार, पीठापूर, कुरवपूर इत्यादी यात्रा परिक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात.

परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पुणे हे करणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा, मिलिंद जोशी, गिरिप्रेमी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे, काशी पंचक्रोशी परिक्रमा संघाचे अध्यक्ष पंडीत विश्‍वनाथशास्त्री पाळंदे, भारती ठाकूर, उष:प्रभा पागे आदी उपस्थित राहणार आहेत.