पुण्यात वकिलावर हल्ला करणारे दोघे जेरबंद !

0

पुणे :अ‍ॅड.देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री गोळीबार करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले. कुर्मादास बडे(रा.शिरुर) असे त्याचे नाव असून दुसरा अल्पवयीन आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवाजीनगर न्यायालयातील वकिलांनी न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार टाकून न्यायालयाच्या गेटबाहेर निर्दशने केली. त्यात वकिल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एक दिवाणी केस बडे याने अ‍ॅड.देवानंद ढाकणे यांच्याकडे दिली होती. हा खटला लढविण्यासाठी त्यांनी अ‍ॅड.ढाकणे यांना २ लाख रुपये फी दिली होती. मात्र, खटला सुरु होण्यापूर्वीच बाहेर त्यांच्या तडजोड झाली होती. त्यामुळे बडे हा अ‍ॅड.ढाकणे यांच्याकडे फी परत मागत होता. मात्र, त्यांनी ती परत न केल्याने त्याने एका मुलाच्या मदतीने गोळीबार करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला.

गुन्हे शाखेकडून रात्रभर विविध ठिकाणी छापे मारुन त्यांचा शोध घेतला जात होता. आज सकाळी चिखली परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले.