पुणे: हिंजवडी परिसरात १२ वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी या मुलीच्या आईने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गणेश निकम याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं आहे.
माहितीनुसार, ‘बारा वर्षे वयाच्या दोन मुली रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी गणेश आणि त्याचा मित्र उभे होते. या दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून मंदिरामागील झुडुपात नेले. यातील एका मुलीवर दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीवर एकाने बलात्कार केला.
ही घटना उघड होताच पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त श्रीधर जाधव आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे तपास करीत आहेत.