नंदुरबार। येथील सनातन संस्थेच्या व हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागरण अभियानाला वेग दिला. सनातन संस्थेचे संस्थापक तथा हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परमपुज्य डॉ.जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे विविध उपक्रम राबवणे सध्या सुरु आहे. या अंतर्गत नंदुरबार शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. या पुतळ्याजवळ फळे-भाज्या विकणारे मनोहर चौधरी, किशोर भोई, सदाशिव भोई, प्रशांत नुक्ते, कमला भोई, युवराज भोई यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील, भावना कदम, प्रा.डॉ.सतिष बागूल यांनीही यात सहभाग घेतला. याच बरोबर बालशहिदांच्या स्मारकाचीही स्वच्छता करण्यात आली. त्याप्रसंगी पवन चव्हाण, प्रेम पेंढारकर, रोहित भावसार, ऋषिकेष सोनार आदींसह रेडीमेड कापड दुकानातील काम करणार्या मुलांनी उत्स्फूर्तपणे उपक्रमात सहभाग घेतला.
साधना आणि हिंदू राष्ट्र या विषयावर मार्गदर्शन
दरम्यान, पखाली कुवा परिसरातील श्री सप्तश्रूंगी माता मंदिर येथे साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर निवेदिता जोशी यांनी प्रवचनातून मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील 25 महिला व युवती प्रवचनाला उपस्थित होत्या. तसेच भोणे येथील श्री मारुती मंदिरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी मनोज माळी, राकेश माळी, राहूल निळे, दर्शना माळी, कल्पेश चौधरी, सुरेश जैन, भावना कदम आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला. या आधी शहरातील मरीमाता मंदिरातही स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. उषा मराठे, तेजश्री धात्रक, कुसूम हराळे, भुषण पाटील, गौरव मराठे, वैभव मराठे, हर्षल परदेशी, चेतन चौधरी आदींनी सहभाग घेतला.